आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात “मुक्त काव्य वाचन” कार्यक्रम संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय गगनबावडा येथे दि. १३/०१/२०२५ रोजी ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” अंतर्गत ” मुक्त काव्य वाचन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमापूजनानेआणि अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

Advertisements

महाविद्यालयाचे *एन.एस.एस. प्रकल्पाधिकरी प्रा. ए. एस. कांबळे* यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रा. ए. सी. कुंभार, प्रा. एच. एस. फरास, प्रा. डॉ. एस. एस. भोसले आणि प्रा. ए. एस. कांबळे यांनी काव्य वाचनाने उपस्थितांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” या उपक्रमाबाबत विस्तृत मार्गदर्शन करत कविता वाचनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचलन प्रा. एस. ए. मोहिते मॅडम यांनी केले. तर आभार प्रा. ए. सि. कुंभार यांनी मानले.

Advertisements

या कार्यक्रमासाठी *संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सतीश देसाई आणि सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई, प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील* यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisements

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!