मुरगूड ( शशी दरेकर ) – संतांचे विचार गाडगेबाबांनी (Gadge Baba) साध्या सोप्या गोष्टीतून समाजाच्या मनावर बिंबवून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. संतांचे आचार विचार अंगीकारण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो.असे प्रतिपादन युवा प्रवचनकार प्रा नितेश रायकर यांनी केले. येथील वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने आयोजित निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा (Gadge Baba) पुण्यदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भुदरगड तालुका बांधकाम विभागाचे उपअभियंता डी व्ही कुंभार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वृद्ध सेवाश्रम वंदूरच्या अध्यक्षा विमलताई सुतार व शाश्वत विकास चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ अर्जुन कुंभार हे होते.
सातत्यपूर्ण उपक्रमाचे हे २१ वे वर्ष आहे.
प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे, प्राचार्य जी.के. भोसले, मुख्याध्यापिका सौ भारती सुतार, सभापती सोमनाथ यरनाळकर ,मा.प्रा. संभाजी आंगज, मा.नगरसेवक किरण गवाणकर,अक्षय गोरुले, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश तिराळे, ज्येष्ठ नागरिकचे शिवाजीराव सातवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रवचनकार रायकर म्हणाले, संतांचे विचार आणि वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान सोप्या उदाहरणांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम गाडगेबाबांनी केले. त्यांनी अंधश्रद्धेवर आणि जाती व्यवस्थेवर प्रहार केले.
या नंतर शशिकांत लिंगाप्पा सुतार (सुतारकाम ), रणजित श्रीकांत कदम (आरोग्य कर्मचारी) , कुंडलिक गुंडू शिंदे (शेतकरी), रुक्मिणी केरबा कांबळे(आरोग्य कर्मचारी),विष्णू गणपती कांबळे (आरोग्य कर्मचारी),अशोक नामदेव कांबळे(आरोग्य कर्मचारी),श्रीमती अमिता सुधाकर कांबळे(आरोग्य कर्मचारी),रामचंद्र गोविंद रनवरे( नाभिक व्यवसाय), दादोबा धोंडीबा मडिलगेकर (गवंडी काम), बाळासाहेब सुतार(हाॅटेल आचारी),
आनंदा लहु भोसले (स्वच्छता कर्मचारी) या सेवा कष्टकरी ज्येष्ठांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. स्वागत प्रा. रवींद्र शिंदे यांनी, प्रास्ताविक प्रविण सुर्यवंशी यांनी, सूत्रसंचालन ओंकार पोतदार यांनी, तर आभार दयानंद सागर यांनी मानले.
या कार्यक्रमास श्री .व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर , नगरसेवक , सुनील रणवरे,एम डी कांबळे, ओंकार टिपुगडे,महादेव साळोखे,अॅड. राणाप्रताप सासणे, मोहन जिरगे,सदाशिव एकल,विश्वनाथ शिंदे, भीमराव पाटील, शिवाजी कांबळे, सर्जेराव भाट,महादेव कानकेकर, प्रा सुनील डेळेकर,राजू चव्हाण, संदीप सूर्यवंशी, यशवंत परीट,सखाराम सावर्डेकर, आप्पासो कांबळे, पाप्पा जमादार, जयवंत गोंधळी, संदीप मुसळे आदिंसह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता झुणका-भाकरी-कांदा प्रसादाच्या वाटपाने करण्यात आली.