ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ केडीसीसीवर बिनविरोध

कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची केडीसीसी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. कागल तालुका विकास सेवा संस्था गटातून त्यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक अधिकारी अरुण काकडे यांनी मंत्री  मुश्रीफ यांना बिनविरोध घोषित केले.

Advertisements
DS patsanstha

त्याबद्दल पालकमंत्री व  गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजयदादा मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राजेश लाटकर, संभाजीराव भोकरे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला.यावेळी मंत्री मुश्रीफ  म्हणाले, “गेली सहा वर्ष बँकेने  फिनिक्स पक्ष्याप्रमाणे घेतलेली गरुडभरारी लौकिकास्पद आहे. शेतकरी सभासदांच्या विश्वासाचे फलित म्हणजे माझी बिनविरोध झालेली निवड आहे. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्यरत राहू.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!