मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल सर्व परिचीत असणारी सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शेळेवाडी ता . राधानगरी शाखेतर्फे येथिल कर्जदार श्री . संतोष मांगले यानां नवीन एक्सकॉर्ट फायटर क्रेन या वाहन खरेदी हायरपरचेस योजनेअंतर्गत ४१ लाख रुपये कर्ज वितरण संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री . किशोर विष्णूपंत पोतदार यानीं दिली.
सदर वाहन वितरण कार्यक्रमात एक्सकॉर्ट क्रेनचे पूजन चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन श्री. मांगले यानां चावी सुपूर्त करण्यात आली. यावेळी चेअरमन पोतदार म्हणाले ३० नोव्हेंबर अखेर संस्थेकडे ११८ कोटी ठेवी व ८० कोटी कर्जे आहेत व शेळेवाडी शाखा येथे ७ महिन्यात २ कोटी ८१ लाखांच्या ठेवी आणि २ कोटी६९ लाखांचे कर्जवितरण केलेले आहे.
तसेच मार्च २०२५ पर्यंत १२५ कोटीचा ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे . कर्जदारांची पथ पाहून कर्जदारानां कर्ज पुरवठा करण्यात संस्था नेहमीच अग्रेसर आहे . कर्जदारानीही कर्जाची मुदतीत परतफेड करून सहकार्य केले आहे . त्याचबरोबर सभासद , ठेवीदार यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभले आहे.
सदर वाहन वितरण कार्यक्रमास व्हा . चेअरमन श्री . दत्तात्रय कांबळे , जेष्ठ संचालक श्री . जवाहर शहा , पुंडलिक डाफळे , संचालक सर्वश्री दत्तात्रय तांबट , अनंत फर्नांडिस , चंद्रकांत माळवदे , विनय पोतदार , रविंद्र खराडे , रविंद्र सणगर, संचालिका सौ . सुजाता सुतार , सौ . सुनिता शिंदे , श्रीमती भारती कामत , तज्ञ संचालक जगदीश देशपांडे , कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी, सचिव मारूती सणगर,सेवक वृंद उपस्थित होते .