सिद्धनेर्ली येथील दूध उत्पादकांनी दिला इशारा
कोल्हापूर(प्रा.सुरेश डोणे) : गोकुळ दूध संघाने गाय दूध दर कपात रद्द करून पूर्ववत दर न दिल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा सिद्धनेर्ली (ता.कागल) येथील दूध उत्पादकांनी दिला आहे.
गोकुळ दूध संस्थेचे चेअरमन अरुण डोंगळे यांना सिद्धनेर्ली (ता.कागल) येथील सिद्धेश्वर दूध संस्था व दूध उत्पादक यांच्यावतीने दूध दर कपाती विरोधात निवेदन दिले. यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील व बाळासाहेब खाडे उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर दूध संस्थेचे चेअरमन संदीप गुरव म्हणाले सध्या पशुखाद्याचे दर प्रचंड वाढलेले आहेत शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम देखील अद्याप मिळालेली नाही महागाई दिवसेंदिवस वाढत आहे अशावेळी दूध दरवाढ करणे ऐवजी गाईच्या दुधाला प्रति लिटर तीन रुपये कमी केल्याने दूध उत्पादक प्रचंड अडचणीत आहे यामुळे गोकुळणे केलेली दर कपात पूर्ववत न केल्यास सर्व दूध उत्पादकांच्या वतीने मोठे जन आंदोलन उभे केले जाईल.
यावेळी व्ही.जी.पोवार, पांडुरंग पोवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी राज्यात इतरत्र गाय दूध दर फार कमी आहे दूध पावडरचा दर व इतर उत्पादन या सर्वांचा विचार करून हा दर नियमित केले असे सांगितले याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन शिवाजी मगदूम, राघू हजारे, मधुकर आगळे, अरविंद पाटील,आनंदा पाटील ,शामराव पाटील, राजेंद्र पाटील ,राहुल मेटिल, बंडा भीसुरे, संभाजी ठाणेकर हे उपस्थित होते.
“Amazing post, keep up the good work!”