गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : शिये ता. करवीर येथील मेंढ्यांच्या कळपावर बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला करून शेळीची शिकार केली. ही घटना मामाचा माळा परिसरात मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास सर्जेराव शिसाळ, शंकर शिसाळ हे राखणीला होते. ते कळपाशेजारी जेवण करत होते. तेवढ्यात राखणीची कुत्री जोरजोरात भुंकू लागली.
शेजारी असलेल्या प्रकाश भानुदास पाटील यांच्या उसाच्या शेतातून बिबट्या सदृश प्राण्यानी येऊन मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यातील एक मेंढी त्याची शिकार बनली. शेजारी असलेल्या राखणीच्या मेंढपाळांनी आरडाओरडा केला असता बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याला मेंढपाळ सर्जेराव शिसाळ, शंकर शिसाळ यांनी स्वतः पाहिले असे ते म्हणाले. मेंढपाळ सुरेश सिसाळ यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली.
वनविभागाने घटनास्थळी पंचनामा चालू आहे.आजून ठोस पुरावे सापडले नाहीत तरीही नागरिकांनी सतर्क राहावे वनविभागाने कडून सांगण्यात आले.संध्याकाळ पर्यंत या घटनेचा खुलासा होईल तसेच या ठिकाणी वनविभागाकडून खात्री करण्यासाठी रात्री कॅमेरा लावण्यात येणार आहे अशी माहिती वनविभागातील घोलप यांनी दिली.