ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत साखर कारखानदारां सोबत बैठक घेण्यात येईल – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर (जिमाका) : कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरु होत असून शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत केलेल्या वाढीव मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकऱ्यांची लवकरात लवकर बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यात येईल, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.

Advertisements

       सन 2023- 24 गळीत हंगामातील 200 रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम 2024-25 च्या 3 हजार 700 रुपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी तसेच अन्य मागण्यांबाबतची निवेदने विविध शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली होती. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहकार विभागाचे सहसंचालक गोपाळ माळवे, तहसीलदार स्वप्नील पवार, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुजित निणचेकर व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

Advertisements

        प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, आजच्या बैठकीत काही कारखानदार उपस्थित नाहीत. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी कारखानदारांच्या उपस्थितीत पुढील बैठक घेण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ कारखानदारांना रितसर पत्र पाठविण्यात येईल. प्रलंबित व ऊस दरवाढीबाबत असणाऱ्या शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर पुढील बैठकीत चर्चा करण्यात येईल. तसेच कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समन्वयाने या मागण्या पूर्ण होण्याविषयी मार्ग काढला जाईल.

Advertisements

         माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, प्रशासनामार्फत कारखानदारांना रितसर पत्र देवूनही आजच्या बैठकीत कारखानदार उपस्थित झालेले नाहीत. लवकरात लवकर कारखानदार व शेतकऱ्यांची परत बैठक बोलवा व यावर मार्ग काढावा, असे आवाहन त्यांनी केले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!