मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुदाळतिट्टा शाखेचा १९ वा वर्धापनदिन मोठया उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाला. वर्धापनदिना निमित्य ७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटानीं सौ. व श्री. रणजित पु . मोरबाळे (पासिंग ऑफिसर ) यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा पार पडली.
यावेळी व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर , व्हा . चेअरमन प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री किशोर पोतदार, प्रशांत शहा, शशिकांत दरेकर, साताप्पा पाटील, हाजी धोंडिराम मकानदार , नामदेवराव पाटील , निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका सौ . रोहिणी तांबट , सौ . सुनंदा जाधव ,कार्यलक्षी संचालक सुर्दशन हुंडेकर ,यांच्यासह सुरेश जाधव, कर्मचारी वर्ग , सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.