मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल)येथील साहित्यिक व मुरगूड विद्यालय मुरगूडचे इंग्रजी विषयाचे माजी आध्यापक,ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत माळवदे यांच्या ” गोवऱ्या आणि फुले ” या आत्मचरित्रास सर्वोत्तम राज्यस्तर वाङमय निर्मितीचा , मुंबई येथील वंदना प्रकाशन पुरस्कृत ” आशिर्वाद पुरस्कार ” मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह स्वरुपात पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.
३० नोव्हेंबर २०२४ रोजी दादर -माटुंगा येथील वा . ना . गोखले सभागृहात साहित्यिक चंद्रकांत माळवदे यानां सन्मानित करुन पुरस्कार बहाल करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ . रविंद्र शोभणे , इंग्रजी साहित्य अभ्यासक डॉ . राजीव श्रीखंडे व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सन्मानीत साहित्यिक डॉ . सुनील सावंत आणि साहित्यिक मान्यवर , साहित्यिक प्रेमी यांच्यासह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. माळवदे यांच्या “गोवऱ्या आणि फुले ” या त्यांच्या आत्मचरीत्रास मिळालेला हा तिसरा राज्यस्तर पुरस्कारअसून त्याबद्दल विविध स्तरातून श्री माळवदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.