![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/11/images-24.jpeg)
कागल( विक्रांत कोरे) : येथील जयसिंगराव पार्क व यशीला पार्क परिसरातील बिबट्याचे दर्शन झाले आहे.नाररिकाना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांच्या माहिती नुसार,नागरिकांना सुचित करण्यात येते की, रात्री ७.३० ते ७.४५ च्या दरम्यान श्री. जयसिंगराव पार्कच्या कमानीपासून हायवे चा रस्ता ओलांडून यशीला पार्क कडे बिबट्या जात असल्याचे एका नागरिकास दिसून आले आहे .अशी तक्रार कागल पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे. जयसिंगराव पार्क व येशीला पार्क परिसरातील सर्व नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष रहावे व सदरचा बिबट्या कोणास दिसल्यास वन विभाग कोल्हापूर *प्रादेशिक* व कागल पोलीस ठाणे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. असे आवाहन कागल पोलीसातून करणेत आले आहे
Revolutionize your weighing needs with BWER, Iraq’s top provider of weighbridge systems, featuring unparalleled accuracy, durability, and expert installation services.