मुरगूड (शशी दरेकर) : गगनबावडा व परिसरात आलेल्या मजुर, फेरीवाले आणि उपेक्षीतांना पद्मश्री डॉ.ग.गो. जाधव महाविदयालयाने त्याच्या समवेत दिवाळी साजरी केली. या निमित्ताने सहभागी कुटुंब सदस्यांना मायेचे पांघरुन ब्लँकेट, साडी, शर्ट, पँट, लहान मुलांची कपडे सोबत, चकल्या, लाडु, करंज्या, चिवडा असा दिवाळीचा फराळ यांचे वाटप प्राचार्य, डॉ. टी. एम. पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विवेक वाहिनी यांच्या वतीने सदर उपक्रम राबण्यात आला. उपप्राचार्य डॉ. संदीप पानाती, रा.से.यो. समन्वयक प्रा. आदिनाथ कांबळे, विवेक वाहिनीचे प्रमुख प्रा. रोहित सरनोबत यांच्या सहयोगाने तसेच प्रा.अरुण गावकर, प्रा.सुप्रिया घाटगे, प्रा.सौरभ देसाई, प्रा.शितल मोहिते, प्रा.हुसेन फरास, प्रा.ऋत्विक नर, प्रा. ऐश्वर्या धामोडकर, प्रा.रिया पाटील यांच्या व विद्यार्थ्यांच्या सहभागाने सदर उपक्रम पुर्णत्वास गेला.
सदर उपक्रमास आनंदी शिक्षण मंडळाचे चेअरमन प्रा. सतीश देसाई, सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लागले.
सुमारे १७ कुटुंबांनी सदर उपक्रमाचा लाभ घेतला. कोसो मैल दूर आलेल्या या लोकांची दिवाळी साजरी झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह व समाधान ओसांडून वाहत होते.
उपेक्षीत व मागास लोकांचे सर्वांगीण जीवन उंचवण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे मत प्राचार्य, डॉ. टी. एम. पाटील यांत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौरभ देसाई व आभार प्रा.अरुण गावकर यांनी मानले.