गोकुळ शिरगांव(सलीम शेख) : नेर्ली (ता. करवीर) येथे बिहारी बांधवांनी छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. मावळत्या आणि उगवत्या सूर्याची विधिवत पूजा करून व्रतस्थ महिलांनी पाण्याच्या कुंडात उभे राहून नैवेद्य दाखवला.
बिरोबा मंदिरासमोर उत्सव नेर्ली येथील बिरोबा मंदिरासमोर हा उत्सव साजरा झाला. व्रती महिलांनी गहू, तूप, गूळ आणि पाच फळांचा नैवेद्य दाखवला. कुंडाभोवती उसाची पूजाही उभारली होती.
दूरदूरून उपस्थित नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगांव, विकासवाडी, कणेरी, उजळाईवाडी आदी गावांतून बिहारी बांधव या उत्सवासाठी एकत्र आले.
[democracy id=”current”]
छठपूजेचे महत्त्व दिवाळी सणानंतर सहाव्या दिवशी छठपूजेला सुरुवात होते. पाण्यामध्ये उभे राहून व्रती सूर्याला नमस्कार घालून ध्यान करीत शेवटची पूजा करतात.
यावेळी अंगद भगवानजी विश्वकर्मा, जितेंद्र दीनदयाळ विश्वकर्मा, राजेश्वर गिरी, सुभाष तिवारी, कन्हया ठाकूर, उपेंद्र साह, आचल विश्वकर्मा, मनोज सिंग, दामोदर सिंग, धरेश गिरी, आखलेश शर्मा उपस्थित होते.