
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पोलिस ठाणे हद्दीत मुरगूडसह अनेक गावामध्ये मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि शिवाजी करे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढण्यात आला.

विधानसभा निवडणूक २०२४च्या अनुषंगाने मुरगूड पोलिस स्टेशनपासून , बाजारपेठ , जवाहर रोड , स्टँड परिसर , पाटील कॉलनी , तुकाराम चौक , गावभाग आदी ठिकाणासह यमगे , सोनगे , हमीदवाडा , चिखली , माद्याळ , कापशी , तमनाकवाडा , बिद्री , बोरवडेसह अनेक गावांमध्ये रुट मार्च काढण्यात आला.

या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक , पोलिस अंमलदार , सुरक्षा दल , अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.