कागल : कागल नगरपरिषद आरोग्य विभागाचे वतीने गहिनीनाथ उरूसा निमित्ताने 24 तास यंत्रणा सुरू ठेवली आहे. यामध्ये 100 कर्मचारी काम करत आहेत, रस्ते सफाई सकाळी आणि संध्याकाळी या दोन सत्रात महिला सफाई कर्मचारी यांचे वतीने सुरू ठेवली आहेत.
तसेच कचरा उठाव 24 तास सुरू ठेवला आहे या करिता 15 कर्मचारी काम करत आहेत 10 घंटागाडी दैनंदिन कचरा उठाव करत आहेत. नेहमीच्या कचऱ्या पेक्षा उरुसा निमित्त पाच पट कचरा वाढ असून त्याची निर्गत आरोग्य विभाग 24 तास यंत्रणा कार्यरत ठेवली आहे.उरूस कालावधीत कोणतीही साथसदृश्य परिस्थिती पसरु नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून धूर फवारणी पावडर फवारणी गटर सफाई सुरू आहे.
गहिनीनाथ दर्गा मध्ये 24 तास सफाई करीत 12 कर्मचारी कार्यरत ठेवले आहेत. तसेच या वर्षी विधान सभा निवडणूक 2024 कामकाज,आचारसंहिता अंमलबजावणी आणि आरोग्य च्या दैनंदिन कामा व्यतिरिक्त या कामाचा ही अतिरिक्त ताण आरोग्य विभागा वर असलेने हे ही काम आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने कामे पार पाडत आहेत तसेच शौचालय सफाई ही दोन वेळा सुरू ठेवली आहे तसेच पाणी पुरवठा ही टँकर द्वारे रात्रं दिवस सुरू आहे.
तसेच सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना करणे बाबत सर्व पाळणे व्यावसायिक याना आरोग्य विभागाचे वतीने नोटीस देणेत आलेल्या आहेत. इ कामे मुख्याधिकारी श्री. अजय पाटणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, दस्तगिर पखाली, स्वच्छता मुकादम दीपक कांबळे , प्रथमेश कांबळे, बादल कांबळे, कौतुक कांबळे, महिला सफाई कर्मचारी रिक्षा घंटा गाडी वाहन चालक ट्रॅक्टर वाहन चालक इत्यादी अधिकारी व सर्व आरोग्य विभाग कर्मचारी अहो रात्र काम करत आहेत.