शिवभक्तांचा दिपावलीतील स्तुत्य उपक्रम
मुरगूड ( शशी दरेकर ) : दीपावलीत लक्ष्मी पूजेला मोठे महत्व असते.पूजेसाठी मोठ्या प्रमाणात ऊस वापरले जातात. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे ऊस कचरा गाडीवर चढवले जात असत. पण,
मुरगूड मधील शिवभक्तांनी हे ऊस गोशाळेला अर्पण करायचे ठरवले. गाईंना उत्तम पशु आहार मिळेल .
त्यांनी सर्व लक्ष्मी भक्तांना विनम्र आवाहन केले की पूजेचे ऊस आम्हीं गोळा करू व गो शाळेला अर्पण करू. गोमतेला शासनाने राज्य दर्जा दिला आहे शिवाय दीपावलीची सुरुवातच वसू बारस म्हणजे गाय वासराच्या पूजेने होते.पशु आहार म्हणून गाईंना ऊस अर्पण करणे हे एक पुण्य कर्म होईल.
बाजार पेठेतील व्यापारी, पत संस्था ,बँका ,छोटे दुकानदार आणि अन्य नागरीक यानी ही कल्पना उचलून धरली व ऊस मोहिमेस उत्तम प्रतिसादही दिला . पूजेच्या दुसऱ्या दिवशी शिवभक्तांनी ट्रॅक्टर ने हे ऊस गोळा केले.तीन टना हुन अधिक ऊस शिवतीर्थावर जमा झाले.हे ऊस जिल्ह्यातील गो शाळांना पाठवण्यात आले. अनपेक्षितपणे मिळालेल्या पशुआहरा मुळे गोशाळा चालक खुश झाले.
शिवभक्तांनी यंदा सुरू केलेला हा उपक्रम लक्ष्मी भक्तांना सुध्दा भावला व त्यांनी या पुण्यशील उपक्रमास दरवर्षी याहून मोठा प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले.
नागरिकांनी सुध्दा या उपक्रमाचे कौतुक केले तर युवकांनी व्यापारी बंधुसह सर्व लक्ष्मी भक्तांना शतश:धन्यवाद दिले.