चुलत जाऊबाईने केली फसवणूक, दीड लाखांची फसवणूक

गोकुळ शिरगाव(सलीम शेख): कंदलगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. माया कृष्णात पाटील यांना त्यांची चुलत जाऊबाई सुप्रिया अमर पाटील यांनी फसवले आहे. लग्नात दिलेले सोन्याचे दागिने नकली असल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisements

माया पाटील यांनी सुप्रियाला लग्नात अडीच तोळ्यांचा नेकलेस, दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार आणि साडेतीन तोळ्यांचा राणी हार दिला होता. नंतर यापैकी नेकलेस आणि राणी हार पतीकडे परत केले. सोनाराकडे तपासणीसाठी दिले असता ते नकली असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisements

सुप्रियाने खरे दागिने किंवा पैशांची भरपाई देण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप ती दिली नाही. याशिवाय, माया पाटील यांच्या चुलत पुतण्या धनाजी शिवाजी पाटील यांनीही दीड लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी माया पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!