गोकुळ शिरगाव येथे भीषण बस दुर्घटना, एकाचा मृत्यू

गोकुळ शिरगाव:(सलीम शेख) – पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव येथे शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास एका खासगी बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एक प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

Advertisements

मृत आणि जखमी प्रवासी बेळगावहून कोल्हापूरकडे जात होते. मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष असावे. सुदर्शन पेट्रोल पंपासमोर उभी असलेली ही बस अचानक पेट घेतली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचे काम हाती घेतले.

Advertisements

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतून पुढील तपास सुरू केला आहे. गोकुळ शिरगाव पोलीस केंद्र सहाय्यक फौजदार शेख हे प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisements

अग्निशमन दलाचे प्रयत्न: अग्निशमन दलाने वेळोवेळी आग विझवण्याचे काम केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतून पुढील तपास सुरू केला आहे.

मृत आणि जखमींची ओळख: मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमींवर उपचार सुरू आहेत

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!