कागल पोलिसांनी पकडला गुटखा

एक लाख  दोन हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त

कागल (विक्रांत कोरे) : महाराष्ट्रात गुटख्याची बंदी असताना देखील कर्नाटकातून विक्रीसाठी वाहतूक करत सुमारे एक लाख  दोन हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल कागल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई कागल  तालुक्यातील शेंडूर फाटा येथे दुपारी बारा वाजण्याचे सुमारास करण्यात आली. अजय भाऊसो पाटील, वय वर्षे 30, राहणार- गायरान वसाहत ,पहिला स्टॉप ,फुलेवाडी कोल्हापूर ,या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisements

           कागल पोलिसांच्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातून गुटखा ळ घेऊन महाराष्ट्र मध्ये विक्री करण्यासाठी आरोपी अजय पाटील हा घेऊन जात होता. दुचाकी मोपेड क्रमांक एम् एच् 09 इ एफ 43 17 वरून गुटक्याने भरलेली मोठी बॅग तो घेऊन जात होता . राज कोल्हापुरी पान मसाला ,केशर युक्त विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला,होता सुगंधी तंबाखू यासह अन्य प्रकार असलेला गुटखा 12 किलो 225 ग्रॅम वजनाचा मोपेड वरून निरसता शेंडूर फाटा येथे पोलिसांनी त्यास पकडले.

Advertisements

          कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, अंमलदार युवराज पाटील, यांनीही कारवाई केली.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!