अकॅडमी संस्थापकांचा यथोचित सत्कार संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) : आदर्श जीवन जगण्यासाठी रचनात्मक, सकारात्मक , आणि जबाबदार शैली कशी असावी, वैज्ञानिक दृष्टीकोन प्रत्येकांच्या अंगी असायला हवे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले . ते गंगापूर येथिल भैरवनाथ देवस्थान नवरात्र महोत्सवाच्या आयोजित व्याख्यानात बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगापूरचे पोलिस पाटील श्री गणपतराव पाटील (आण्णा )होते. यावेळी अकॅडमी संस्थापक मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याधर हुंडेकर यानी केले . त्यानीं गंगापूर गावामध्ये ” सुजाण व जबाबदार नागरिक बनण्यासाठीचे “या व्याख्यानाचा हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले तरुण लोकानां व बाहेरगावाहून येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याना आपल्या पुढील जीवनात ज्या क्षेत्रात व पदावर ते काम करतील व चांगले संस्कार, उपदेश, चांगला आदर्श घेऊन आपल्या देशाचे सुजाण, जबाबदार नागरिक बनतील आणि आपल्या देशाच्या हितासाठी रक्षणासाठी काम करतील ही काळाची गरज आहे . आज अखेर गंगापूर गावाने येथिल अकॅडमीच्या माध्यमातून देशसेवेसाठी सैनिक असो पोलिस अधिकारी व अन्य क्षेत्रात मुलानां सेवा करण्याची संधी दिली . यामुळेच गंगापूर गावची ओळख अकॅडमीचे गांव म्हणून महाराष्ट्र व देशात नावलौकीक मिळविला आहे.
सत्कारमूर्तीच्या वतीने सत्काराला उत्तर देतानां म्हणाले गंगापूर गावातील व्यक्ती ही गुरु असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांना उर्जा देण्याचे काम आमच्या गावातील नागरीक करतात . त्यामुळे येथे प्रवेश घेतलेले विद्यार्थी यशश्वीपणे उंच भरारी घेतात.
या कार्यक्रमासाठी बळीराजा, उज्वल, वंदे, राजमुद्रा, संघर्ष, विवेकानंद या अकॅडमीचे विद्यार्थी,मिणचे शाळेचे माजी मुख्याध्यापक देसाई सर , प्रमुख आयोजक विद्याधर हुंडेकर ( मा. मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य मंत्रालय को. ऑप बँक मुंबई ), एकनाथ घाटगे , बाजीराव गोडसे ( सुभेदार मेजर आर्मी ), गंगापूरकर पुणे ग्रुपचे समाजसेवक अमर पाटील, बजरंग पाटील, तसेच रामदास गुरव , एम पी पाटील , सुदर्शन हुंडेकर ,यांच्यासह विद्यार्थी, अकॅडमीचे मान्यवर, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथ . शिक्षक सुनिल गुरव यानी केले . तर आभार अमर पाटील यानीं मानले .