मुरगूडच्या शिवराज विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ विजयी

मुरगूड ( शशी दरेकर ) : बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

Advertisements

          बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्या स्पर्धेत शिवराज विद्यालयाच्या संघाने पहिल्या सामन्यात मोहनलाल दोशी विद्यालय अर्जूननगर या संघावर  २३ – २५ , २५ – १२ व १५ – ९ अशा गुणफरकाने विजय मिळविला. उंपात्य सामन्यात शाहु हायस्कूल कागल संघाचा २५ – २२ , २५ – १४ असा लिलया पराभव करीत अंतिम फेरी गाठली.अंतिम फेरीत जयसिंगराव घाटगे हायस्कूल कागल संघाचा १५ – २५ , २५ – २२ व १५ – ९ असा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला.

Advertisements

           संघातील खेळाडू असे : अथर्व मेटकर ( कप्तान ) , साई भराडे , विराट पाटील , तन्मय खैरे , मंदार धर्माधिकारी , समाधान राऊत , मेघराज भारमल, जय सामंत , पुष्कर सुतार , निरंजन संकपाळ , सम्राट मसवेकर , समर्थ डवरी

Advertisements

           या खेळाडूंना व्हॉलीबॉल प्रशिक्षक , माजी प्राचार्य महादेव कानकेकर , क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे , संभाजी मांगले , अजित गोधडे , विनोद रणवरे ,सुहास भारमल , अमित साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले . तर संस्था सेक्रेटरी मा.खा. संजयदादा मंडलिक , कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक , अध्यक्ष गजाननराव गंगापुरे , कार्यवाह आण्णासो थोरवत , प्राचार्य जी के भोसले , उपमुख्याध्यापक व्ही बी खंदारे , पर्यवेक्षक पी पी सुर्यवंशी , उपप्राचार्य एल व्ही शर्मा यांचे प्रोत्साहन लाभले.
.

4 thoughts on “मुरगूडच्या शिवराज विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ विजयी”

  1. Hello i think that i saw you visited my weblog so i came to Return the favore Im trying to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas

    Reply
  2. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!