नोकरीच्या आमिषाने ७ लाखांची फसवणूक !

गोकुळ शिरगाव: कणेरीवाडी हद्दीतील एका हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची 7 लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी आशिष वरांबळे, किरीटकुमार पटेल आणि गजानन देशपांडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

          संशयितांनी लंडनमध्ये फूड लॉजिस्टिक कंपनी आहे आणि त्यासाठी नोकर भरती चालू आहे असे सांगून सेमिनार घेतले. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांनी कागदपत्रे दाखवली आणि साक्षीदारांचा विश्वास संपादन केला.
  पीडित अजिंक्य गायकवाड यांच्याकडून 7 लाख रुपये घेतले, पण नोकरी लावली नाही.

Advertisements

         पीडिताच्या फिर्यादीवरून संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास अधिकारी सपोनि दिगंबर गायकवाड यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Advertisements
AD1

1 thought on “नोकरीच्या आमिषाने ७ लाखांची फसवणूक !”

Leave a Comment

error: Content is protected !!