मुरगूड परिसरातील घरगुती गौरी – गणपतीनां उत्साहाच्या वातावरणात निरोप

मुरगूड( शशी दरेकर ) : मुरगूड परिसरात घरगुती गौरी गणपतीचे उत्साही वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आले ” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला फटाक्याची आतषबाजी करीत आपल्या गणरायाला निरोप दिला. पाऊस नसल्याने गणपती विसर्जनामध्ये उत्साह दिसून येत होता.

Advertisements

परिसरातील काही सार्वजनिक मंडळांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले .टाळ मृदंग ,भजन पारंपारिक वाद्य ,खेळ यांनी विसर्जन मिरवणुकानी अधिक रंग भरला होता.

Advertisements

भक्तगण भक्तिरसात नाव्हून निघाला होता. मुरगूड पोलीस स्टेशन, युथ सर्कल व मुरगूड येथील  पाटील गल्ली, रावण गल्ली, महादेव गल्ली, चौगुले गल्ली, भोई गल्ली , परीट गल्ली, सावर्डेकर कॉलनी, सरपिराजी रोड, जवाहर रोड, राणा प्रताप चौक ,बाजारपेठ, एकत्र येऊन गावातील गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

Advertisements

अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने निर्माल्य कुंड , मूर्ती दान संकलित करण्यात आले. मुरगूड नगरपालीका कर्मचारी भैरू कुंभार , महेश कांबळे , नुरेश वाघेला, प्रकाश म्हेतर , अलका कांबळे , मालूताई कांबळे , शिवभक्त व सामाजिक कार्यकर्ते यानीं नियोजन केले .

AD1

1 thought on “मुरगूड परिसरातील घरगुती गौरी – गणपतीनां उत्साहाच्या वातावरणात निरोप”

  1. I’ve read several just right stuff here. Certainly price bookmarking for revisiting. I wonder how a lot effort you place to create this kind of great informative website.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!