मुरगूड (शशी दरेकर) : भरधाव वेगाने कर्नाटकातून आदमापूरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या दुचाकीने मॉर्निंग वॉक करून गावाकडे परतणाऱ्या निढोरी ता. कागल येथील दिलीप महादेव पाटील ( वय ६२ वर्षे ) याना जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी अवस्थेतील दिलीप पाटील यांच्यावर उपचार चालू असताना मयत झाले. मयत दिलीप पाटील हे श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचे माजी व्हाईस चेअरमन केशवकाका पाटील यांचे चुलत बंधू होत. अपघाताची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, निढोरीतील दिलीप पाटील हे रोजच्याप्रमाणे मुरगुडच्या दिशेने मॉर्निंग वॉक करून पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास परत आपल्या गावी निघाले होते. सूर्यवंशी पेट्रोल पंपा जवळ असताना पाठीमागून कर्नाटकातून दुचाकी (नं. KA23TR8880) वरून सुरेश बाळासो बालिंगे ( वय ५५ वर्षे ) रा. बेडकीहाळ ता. चिकोडी हे पत्नी सुरेखा (वय ५० वर्षे ) समवेत घेऊन आदमापुरातील बाळूमामांच्या देवदर्शनासाठी निघाले होते. आलेल्या दांपत्याची दूचाकीची त्यांना जोरात धडकली. यामुळे श्री. पाटील रस्त्यावर जोरात आपटले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले.
दरम्यान दुचाकीस्वार सुरेश बालिंगे गंभीर जखमी असून त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी इस्पितळात उपचार चालू आहेत. अपघाताची नोंद उशिरा मुरगुड पोलीस ठाण्यात झाली. मयत दिलीप पाटील यांच्या मुलग्याचे गेल्या आठवड्यातच लग्न झाले होते. घरी अत्यंत आनंदी वातावरण असताना घडलेल्या घटनेने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. कै. दिलीप पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. ४ रोजी सकाळी ९ वा. आहे.
Somebody essentially lend a hand to make significantly posts I might state That is the very first time I frequented your web page and up to now I surprised with the research you made to create this particular put up amazing Excellent job
Wow amazing blog layout How long have you been blogging for you made blogging look easy The overall look of your web site is magnificent as well as the content