कागल (विक्रांत कोरे): कागल नजीक राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे कामातील साहित्याची चोरी 28 ऑगस्ट च्या रात्री झाली होती. त्याचा तपास कागल पोलिसांनी केवळ 24 तासात लावला . या प्रकरणातील चार आरोपींना गजाआड करीत त्यांच्याकडून दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मध्ये चोरीस गेलेल्या मालासह ऑपे रिक्षा पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.
राहुल रामचंद्र देवडकर (वय वर्षे 24 राहणार बानगे तालुका कागल ), सुरज अनिल बनगे वय वर्ष 30 व ओंकार राजू बागडे वय वर्षे 23 दोघेही राहणार गणेश नगर रूकडी ,तालुका- हातकणंगले ,युवराज रामा गोसावी वय वर्ष 19 राहणार इंगवले मळा, हातकणंगले ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रुकडी तालुका हातकणंगले येथील पवन कांबळे हा आरोपी अद्याप फरारी आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महा मार्ग रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे. लक्ष्मी टेकडी ते कागल शहराकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान जयसिंग तलावाचे प्रवेशद्वाराजवळ सध्या काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी 28 सेंट्रींग च्या लोखंडी प्लेटा ,छोटा ऍपे रिक्षामध्ये भरून नेल्या होत्या. हा चोरीचा प्रकार 28 ऑगस्ट 2024 रोजी रात्री अडीच वाजण्या सुमारास घडला होता.
या चोरीची माहिती एका बातमीदारामार्फत मिळवत कागल पोलिसांनी चार आरोपींना गजाआड केले आहे तर एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. चोरीत वापरलेली अपे रिक्षा ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील, हवालदार अरुण कांबळे, पोलीस अंमलदार सुनील कांबळे, युवराज पाटील, आदींनी ही कारवाई केली आहे.
Hello, Jack speaking. I’ve bookmarked your site and make it a habit to check in daily. The information is top-notch, and I appreciate your efforts.
Hello Neat post Theres an issue together with your site in internet explorer would check this IE still is the marketplace chief and a large element of other folks will leave out your magnificent writing due to this problem