उमेश गवळी स्मरणार्थ रक्तदान शिबिर

कागल : ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. अलिकडे रक्तपेढीमध्ये रक्तसाठा कमी पडत आहे. हीच गरज लक्षात ठेवून येथील युवा उद्योजक आणि श्रीनाथ सहकार समूहाचे संचालक उमेश चंद्रकांत गवळी यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. उमेश गवळी विचार मंच आणि श्रीनाथ सार्वजनिक सेवा ट्रस्ट यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे ११वे वर्ष आहे. आतापर्यत सुमारे १५०० हून अधिक रक्त संकलन झाले आहे.

Advertisements

यंदा बुधवार ता. २८ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी शहरात श्रीनाथ सहकार समूह यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूकांनी रक्तदानासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

Advertisements

यावर्षी दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंतांचाही गौरव करण्यात येणार आहे. शहरातील मूकबधिर, कर्णबधिर शाळांमधील विद्यार्थी, निराधार वसतिगृहातील मुलांना स्नेहभोजन व मातोश्रीउ वृद्धाश्रम कोल्हापूर आणि वंदूर येथील सेवाभावी दवाखान्यासाठी देणगी दिली जाणार आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!