मुरगूडमध्ये आरटीओ ऑफिसने कोटा वाढवावा किंवा जादाचा कॅम्प तातडीने लावण्याची मागणी
वाहनधारकांकडून आंदोलनाचा इशारा
मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूडमध्ये आरटीओ ऑफिसने कोटा वाढवावा किंवा जादाचा कॅम्प तातडीने लावावा अशी मागणी करीत या प्रश्नी वाहनधारकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
मुरगुड मध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी दुचाकी आणि चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना (लायसन) प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कॅम्पमधून दिला जातो. गेल्या महिन्यात जिल्ह्यात सर्वत्र महापुराने थैमान घातल्यामुळे याकाळातील कॅम्प झाले नाहीत. प्रत्येक कॅम्पमध्ये आरटीओ ऑफिस ९० इतकी मर्यादित संख्या (कोटा) दिली जाते. प्रचंड़ वाढलेली वाहनांची संख्या आणि परवानाधारकांकडून परवान्यासाठी मागणी करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे आरटीओ कॅम्पचा कोटा अत्यंत कमी आहे. वाहन परवाना मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. वाहन व्यवस्थित चालवता येत असूनही कोट्याच्या मर्यादेमुळे परवाना कमी लोकांना मिळत आहे. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

कागल तालुक्यात एकमेव मुरगुडात सर पिराजीराव गुळ उत्पादक संस्थेच्या प्रांगणात हा आरटीओ कॅम्प होत असतो. गेल्या महिन्यात हा कॅम्प झालेला नाही आणि मर्यादित कोट्याची संख्या याचा विचार करता आरटीओ ऑफिसने कोटा तरी वाढवावा किंवा जादाचा कॅम्प तातडीने लावावा अन्यथा वाहनधारकांकडून या प्रश्नी आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा इशारा करण्यात येत आहे.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.