नागरिकांनी अधीक्षकाना धरले धारेवर
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मध्ये ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या बाबतीत अक्ष्यम्य हेळसांड पणा होत असल्याच्या तक्रारी वारंवार येऊ लागल्याने नागरिकांच्या वतीने एक शिष्टमंडळ येथील वैद्यकीय अधिक्षक डवरी यांना भेटले.
रुग्णालयात डॉक्टर हजर नसतात, आठवड्यातून फक्त दोन दिवसच येतात, वार्ड बॉय मार्फत रुग्णांना औषधे दिली जातात अशा तक्रारी नागरिकांनी सांगितल्या.
या अशा निष्काळजीपणा मुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. कांहीं दिवसापूर्वी एका युवकाचा मृत्यू झाला आहे. त्याबद्दल अनेक युवकांनी संताप व्यक्त केला होता. याबाबत वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय मत्र्याना पण कळविण्यात येईल असे शिष्टमंडळ प्रतींधिनिनी अधीक्षकांना सांगितले. शनिवारी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी येणार आहेत व ते निश्चित कार्यवाही करतील असे अधीक्षकांनी सांगितले.
नागरिकांच्या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनराध्यक्ष दगडु शेणवी, एस व्ही चौगुले, रणजित सुर्यवंशी, दत्ता मंडलिक, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, अरुण सावर्डेकर, रणजित मोरबाळे, जगदीश गुरव, मयूर सावर्डेकर, अनिल रावण, राजू चव्हाण, तानाजी भराडे, प्रकाश पारिश्र्वाड, बिंदु चौगुले, पंकज नेसरीकर, पंकज मेंडके यांच्यासह नागरिकांचा सहभाग होता.