कागलच्या धर्तीवर कृत्रिम धबधबा उपक्रम राज्यात राबवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कागल पाझर तलाव परिसराला अधिकाधिक पर्यटक भेट देतील

कागलच्या पाझर तलावातील संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा, बोटिंग क्लबचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

मटण, चिकन व फिश मार्केटच्या नवीन इमारतीचेही लोकार्पण संपन्न

कोल्हापूर, दि.11 (जिमाका) : कागल मधील निसर्ग संपन्न पाझर तलाव परिसरात तयार करण्यात आलेला कृत्रिम धबधबा, बोटींग, म्युझिक फाऊंटन, व्हॉईस फाऊंटन हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, असे उपक्रम बारामतीसह अन्य ठिकाणीही विकसित करण्यात येतील, अशा शब्दांत या उपक्रमाचे कौतुक करुन या आल्हाददायक परिसराला भेट देण्यासाठी अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Advertisements

              कागल नगरपरिषदेच्या वतीने पाझर तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेला पादचारी मार्ग, संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा तसेच बोटिंग क्लब तसेच मटण, चिकन व फिश, व्हेजिटेबल मार्केटच्या नवीन इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील,  जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, राधानगरी कागल विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

            कागल येथे 13 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून पाझर तलाव परिसर सुशोभित करण्यात आला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याजोगे आल्हाददायक वातावरण निर्मिती या परीसरात करण्यात आली आहे. तलावाच्या काठावर छोट्या कार्यक्रमांसाठी लॉन, तलावात बोटिंग, म्युझिकल फाउंटन (संगीत कारंजा), कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला आहे. पाझर तलाव परिसर पर्यटकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

Advertisements

तसेच 15 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मटण, चिकन, फिश, व्हेजिटेबल मार्केटच्या नूतन इमारतीत 93 गाळे आहेत. या सुसज्ज अशा महात्मा फुले मार्केटमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. याठिकाणी पार्किंग व अग्निशमन व्यवस्था करण्यात आली आहे.

AD1

1 thought on “कागलच्या धर्तीवर कृत्रिम धबधबा उपक्रम राज्यात राबवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार”

Leave a Comment

error: Content is protected !!