मुरगूड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष केबिनमध्ये नमाज पठणाचा प्रकार

मुरगूडमध्ये तणाव

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष केबिनमध्ये दोघाजणांचा नमाज पठणाचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. त्यामुळे हजारो तरुणांचा संतप्त जमाव मुरगूड नगरपालिकेजवळ जमल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. अब्दुल गणी सलाउद्दीन बागवान (वय • ३७) आणि अहमद अमान उल्ला आजखी (वय ३५, रा निपाणी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. प्रभारी मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मुरगूड पोलिसात फिर्याद नोंदवली होती.

Advertisements

मुरगूड येथे आठवडा बाजारात भाजीपाला व फळ विक्रीसाठी आलेले दोन व्यापारी संध्याकाळच्या सुमारास नमाज पठण करत असल्याचे तरुणांना समजले. यापूर्वीही हा प्रकार समजल्याने मंगळवारी अनेकजण मागावर होते, ते व्यापारी नमाज पठण करत असल्याचे प्रत्यक्ष मिळून आले संतप्त झालेल्या तरुणांनी त्यांना पकडून पोलिसांच्या  ताब्यात दिले.

Advertisements

यावेळी नगरपलिकामध्ये कोणीही अधिकारी अथवा शिपाई हजर नसल्याचे दिसून आले. उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये असा प्रकार घडल्याने तरुण प्रचंड संतप्त झाले. त्यांनी अधिकाऱ्यांच्या राजीनामाची मागणी केली. तसेच या नगरपालिकेला वाली कोण ? असा सवालही केला. यावेळी शेकडो तरुणांचा जमाव नगरपालिकेवर जमला होता. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर, प्रभारी डीवायएसपी अरविद रायबोले यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेत माहिती घेतली.

Advertisements

यावेळी शासकीय कार्यालयात नमाज पडण्यासाठी परवानगी देणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी करणारे निवेदन उपस्थित नागरिकांनी डीवायएसपी सुजितकुमार. क्षीरसागर, प्रभारी डीवायएसपी अरविंद रायबोले, पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्याकडे दिले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी जमावाने ठाण्यासमोर महाआरती केली.

AD1

2 thoughts on “मुरगूड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष केबिनमध्ये नमाज पठणाचा प्रकार”

Leave a Comment

error: Content is protected !!