प्रति वर्षि प्रमाणे याही वर्षी पहाटेपासून धार्मिक विधी पार पडणार
मडिलगे (जोतीराम पोवार) : महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग देवाची नागपंचमी यात्रा दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न होत आहे यावेळी भाविकांच्या सर्व सोयी सुविधा सह यात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष व सरपंच बापूसो आरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या पत्नी सौ विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते अभिषेक महापूजा व काकड आरती तसेच इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिर परिसरातील दर्शन मंडपात प्रतिष्ठापित केलेल्या नागमूर्ती तसेच श्रींचे दर्शन भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल दरम्यान पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ज्योतिर्लिंग देवाचे भव्यदिव्य असे हेमाडपंथी मंदिर बांधकाम सुरू असून भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी भाविकांसाठी गारगोटी एसटी आगाराने ज्यादा एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली असून मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्शन रांगेची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे
यावेळी मुरगुड, मुधाळतिट्टा, कुर, वाघापूर अशा एकेरी मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे याचीही भाविकांनी नोंद घ्यावी असे आरडे यांनी गहिनीनाथ समाचारशी बोलताना व्यक्त केले या पत्रकार परिषदेस देवस्थान समितीचे सर्व सदस्य सचिव मारुती सूर्यवंशी सेवक श्रीपती परीट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते