एम. आर. आय. मशीनबद्दल सीपीआर बचाव कृती समितीच्यावतीने सत्कार

आरोग्य सुविधांसाठी वर्षभरात आणला १, २७५ कोटींचा निधी

कोल्हापूर, दि. ५: पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाला सर्व अत्याधुनिक आणि दर्जेदार सोयीसुविधा दिल्या, असे गौरवोद्गार काढले. ते स्वतः आरोग्यदूत असल्यामुळेच गोरगरीब रुग्णांविषयी त्यांना कळवळा आहे, असेही ते म्हणाले.  

            कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सीपीआरला २६ कोटी रुपयांचे एमआरआय मशीन दिल्याबद्दल श्री. मुळीक यांच्या हस्ते मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार झाला.

           श्री. मुळीक म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे खऱ्या अर्थाने आरोग्यदूत आहेत. कारण; त्यांनी लाखो रुग्णांना आरोग्यसुविधा देऊन जगण्याची नवसंजीवनी दिली आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात ६५० बेडची क्षमता आहे. या रुग्णालयात एम. आर. आय. मशीनची नितांत आवश्यकता होती. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ती पूर्ण केली. या मशीनमुळे हजारो रुग्णांचे लाखो रुपये वाचणार आहेत.

            पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय हे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांची जीवनदायिनी आहे. येथील चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

निधी १२७५ कोटींचा…….!
श्री. मुळीक म्हणाले, पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी गेल्या वर्षभराच्या पालकमंत्रीपदाच्या कारकिर्दीत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआर व राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तब्बल १,२७५ कोटीहून अधिक निधी आणला आहे. कोल्हापुरातील आरोग्य सुविधांचा दर्जा आणि गुणवत्ता तर वाढलेलीच आहे. तसेच; कोल्हापुरात वैद्यकीय नगरी साकारत असल्याचा आम्हा सर्व कोल्हापूरवासियांना फार मोठा आनंद आहे.

          यावेळी वसंतराव मुळीक, प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, नितीन दिंडे, संदीप नलावडे, बबन रानगे, अवधूत पाटील, आनंद म्हाळुंगेकर, बाळासाहेब भोसले, प्रताप नाईक, संदीप नलावडे, आदी प्रमुख उपस्थित होते.

One thought on “पालकमंत्री मुश्रीफ यांनी सी. पी. आर. ला सर्व सोयीसुविधा दिल्या – वसंतराव मुळीक”
  1. Thank you for the good writeup It in fact was a amusement account it Look advanced to far added agreeable from you However how could we communicate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!