दूधगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : दूधगंगा धरणाच्या पाणलोट  क्षेत्रामध्ये  जोरदार पाऊस सुरू असून जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी व धरण सुरक्षिततेसाठी धरण सांडव्यावरून आज दिनांक 26/07/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता 2500 cusec ने व विद्युत ग्रहातून 1000 cusec विसर्ग असा एकूण 3500 cusec विसर्ग सुरू आहे.

Advertisements

तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.सदर माहिती दुधगंगा धरण व्यवस्थापन यांनी दिली आहे.

Advertisements

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!