कागल / प्रतिनिधी : रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून रुपये एक लाखास गंडा घातला होता. सदर प्रकरणातील आरोपीस कागल पोलिसांनी तारीख 22 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली आहे. अशोक बापू पाटील वय वर्षे 52 राहणार बेलवळे ,तालुका कागल असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे. अशोक हा बेपत्ता होता. तो एका राजकीय पक्षाचा तालुका अध्यक्ष होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तारीख 7 जानेवारी 2024 रोजी अशोक तुकाराम शेळके, राहणार- तळेगाव दाभाडे,( पुणे) यांना रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून त्यास, बेलवळे येथील एका फार्म हाऊस वर बोलावून घेतले. त्याच्याकडून रुपये एक लाख घेतले व त्या बदल्यात त्यास बंडलाच्या खाली व वरती पाचशे रुपयांच्या नोटा लावल्या. आतील कागद कोरे ठेवून तयार केलेले नोटांचे बनावट बंडल त्याला दिले.
बनावट नोटांचे आधारे कागल पोलिसात आठ जानेवारी 2024 रोजी तक्रार दाखल झाली होती. मेहरून अब्बास सरखवास, खलील रफिक सय्यद, दोघे राहणार -घटप्रभा, तालुका गोकाक जिल्हा बेळगाव-( कर्नाटक राज्य) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वैभव जमादार हे पुढील तपास करीत आहेत.