मुरगूड ( शशी दरेकर ) : आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव . ही एकादशी सगळीकडे मोठया प्रमाणात साजरी केली जाते . या पाश्वभूमीवर मुरगूड ता . कागल येथे आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.
मुरगुड येथील लिटल मास्टर गुरुकुलम ,सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन ,शिवराज विद्यालय या शाळांनी विद्यार्थ्यांच्या आकर्षक आणि पारंपारिक वेशभूषा काढून वारी दर्शन घडवले .यामध्ये लहानग्यांनी साकारलेली विठ्ठल रखुमाईची वेशभूषा सर्वांचे मन वेधून घेत होते. शहरांतील कुंभार गल्लीमधील विठ्ठल मंदिराची पालखीची नगर प्रदक्षिणा मोठ्या उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात पार पडली .
यावेळी सुखदेव येरुडकर कुटुंब , धोंडिराम मकानदार कुटुंब, डॉ . सुरेश बरकाळे कुटुंबानी खिचडी , केळी यासारखे फराळाचे वाटप केले . व बाजार वेठेतील उध्दव मिरजकर , विशाल मंडलीक , अमर गिरी , सागर चौगले , सनी गवाणकर , ओंकार दरेकर , शिवाजी रावण , गणेश कुडवे , अमित दरेकर , विशाल गुरव बंटी गवाणकर ,चेतन गोडबोले , शिवभक्त धोंडीराम परीट , अमोल वंडकर , सागर शहा , नागेश नलगे , यश चौगले या मित्रपरिवारानीं मिळून शाबुचिवडा ,राजीगरा लाडू , शेंगदाणा चिक्की अशा फराळांचे वाटप केले .
शहरांमधील गावभागातून बस स्थानक ,जवाहर रोड ,नवी पेठ, पोलीस स्टेशन ,तुकाराम चौक मार्गे या दिंडीची सांगता मंदिराजवळ झाली. त्याचबरोबर नामदेव शिंपी समाजाच्या विठ्ठल मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या दोन्ही विठ्ठल मंदिरांमध्ये पहाटे पूजा झाल्यापासूनच भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत होते .मुसळधार पाऊस असून देखील पालखी नगरप्रदक्षिनामध्ये भाविक भक्तीरसात चिंब झाले होते .
Hey people!!!!!
Good mood and good luck to everyone!!!!!