मुरगूड ( शशी दरेकर ) : नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा येवू पहात आहे त्यामुळे चळवळी मोडून काढायच्या व श्रमिकांचा आवाज दाबला जाणार आहे हा केंद्र सरकारचा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी मुरगूड येथे बोलताना केले.
येथील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित कॉ अनंत बारदेस्कर स्मृतीदिन कार्यक्रमात कॉ संपत देसाई बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ संतराम पाटील होते.
कॉ देसाई याप्रसंगी बोलताना पुढे म्हणाले या देशातील नैसर्गिक संसाधने अदानी व अंबानीच्या कडे सुपूर्द करायला केंद्र सरकार निघाले आहे . पण इथली संस्कृती निसर्ग व नैसर्गिक साधन संपत्तीसी जोडली गेली आहे . आता नव्या संघर्षाची वेळ आली आहे . श्रमाची वर्गवारी ‘ जातीव्यवस्थे वर आधारित शिक्षण ‘ व एकूणच जगण्या बद्दलची अस्थिरता निर्माण केली जात आहे . उपेक्षितांना शोषीतांना व महिलांना मुक्ती द्यायची असेल तर सर्वांनी लढाईला सज्ज रहावे.
यावेळी या वर्षीचा स्व. कॉ अनंत बारदेस्कर स्मृती पुरस्कार पालिका सफाई कामगार कृष्णा कांबळे यांना देण्यात आला . स्वागत व प्रास्ताविक दलितमित्र डी डी चौगले यांनी केले . कार्यक्रमास दलितमित्र एस आर बाईत , दतात्रय कांबळे , विलास भारमल ,सिकंदर जमादार, कॉ बबन बारदेस्कर, पी आर पाटील आदि प्रमुख उपस्थित होते . समीर कटके यांनी सूत्रसंचालन केले तर बी एस खामकर यांनी आभार मानले.