गगनबावडा येथे समता रॅलीचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा, तहसीलदार कार्यालय गगनबावडा,  पोलीस स्टेशन गगनबावडा आणि ग्रामपंचायत गगनबावडा यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त *समता रॅलीचे आयोजन* करण्यात आले. यावेळी गगनबावडा परिसरातील वाड्या-वस्त्यांवर भर पावसात मोटर सायकल रॅली काढून लोकजागरण करण्यात आले.

Advertisements

यावेळी “राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय” “समतेचा विचार चिरायू होवो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.  या रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील म्हणाले की, ‘शाहू विचारांचा लोकजागर झाला पाहिजे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वसा जनतेने घेतला पाहिजे.’ याप्रसंगी ए.पी.आय. ज्ञानदेव वाघ, गगनबावड्याचे नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे, उपसरपंच वृंदा पाध्ये, माजी उपसरपंच मुस्ताक वडगावे, उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी  उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश देसाई सचिव डाॅ.विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.

Advertisements

कार्यक्रमाचे संयोजन आणि प्रस्ताविक एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. आदिनाथ कांबळे यांनी केले. तर, आभार प्राचार्य एच. एस. फरास यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी आणि नागरिक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

1 thought on “गगनबावडा येथे समता रॅलीचे आयोजन”

Leave a Comment

error: Content is protected !!