पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : सिध्दनेर्ली ता. कागल येथे नामदार हसनसो मुश्रीफ फौंडेशन, शाखा-सिध्दनेर्ली यांच्यावतीने १० वी , १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व नोंदीत बांधकाम कामगारांसाठी संसार साहित्य वाटप गोकुळ दूध संघाचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे शुगर कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संघाचे संचालक कृष्णात मेटील होते .
यावेळी गावचे सरपंच दत्तात्रय पाटील म्हणाले,गावात आज पर्यंत अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांनी आपले यश संपन्न केले आहे.आज गावतील अनेक मुले स्वतःच्या कर्तृत्ववावर अनेक मोठ्या पदावर काम करत आहेत.
यावेळी नविद मुश्रीफ बोलताना म्हणाले ,नामदार हसनसो मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून आज पर्यंत अनेकांना आपण मदत केली आहे .यापुढे ही अशीच समाज उपयोगी कामे या फाउंडेशन च्या माध्यमातून केली जातील.
यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील, उपसरपंच वनिता घराळ, सदस्य संदीप पाटील, मनोहर लोहार, सुभाष मगदूम, सात्ताप्पा मगदूम, तानाजी मगदूम, सौरभ साठे, युवराज पाटील यांच्यासह गावातील इतर प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी स्वागत दत्तात्रय पाटील यांनी केले तर आभार मनोज साठे यांनी मानले.