मुरगूड शहरात महिलांनी भक्तिभावाने केली वट सावित्री पूजा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात जागोजागी महिलांनी भक्तिभावाने वट सावित्री पूजा केली. हिंदू धर्म शास्त्रानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला ही पूजा केली जाते.सावित्री आणि सत्यवान या पतीपत्नींची पौराणिक कथा या उत्सवाला जोडली गेली आहे.कौटुंबिक संस्काराचे हे आदर्श असे प्रतिक मानले जाते.

Advertisements

या दिवशी महिला उपास सुध्दा करतात. वटपौर्णिमा सणाचे शास्त्रीय महत्व सुध्दा सांगण्यात येते. वट अथवा वड या नावाने ओळखले जाणारे हे झाड वातावरणात जास्तीत जास्त ऑक्सीजन विसर्जित करते. वडा प्रमाणे पिंपळ, आंबा, लिंबारा इत्यादी मूळ भारतीय उपखंडात वाढणाऱ्या वनस्पतींचे महत्व वेद शात्रात सुध्दा ऋषी मुनिंनी सांगून ठेवले आहे.

Advertisements

ऑस्ट्रेलियन बाभूळ सारख्या कमकुवत खोडांच्या वनस्पती अमेरिका व पाश्चात्य देशातून आल्या आहेत असे वनस्पती शास्त्राचे अभ्यासक प्रा.योगेश जाधव यांनी सांगितले. धार्मिक व शास्त्रीय दृष्टीने वट पौर्णिमा पूजेला अनन्य साधारण महत्व असल्याचेही ते म्हणाले. महिलांनी दाखवलेला वटपुजे मधील उत्साह व आनंद यामुळे हे महत्व द्विगुणित झाले असे दिसते.

Advertisements
AD1

1 thought on “मुरगूड शहरात महिलांनी भक्तिभावाने केली वट सावित्री पूजा”

Leave a Comment

error: Content is protected !!