९० लाखांच्या नुतन इमारतीत स्थलांतर
मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील सुवर्णमहोत्सवी व सर्वदूर नांव लौकिक मिळवलेली श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेच्या कूर (ता.भुदरगड) च्या अद्ययावत सोयीनी युक्त अशा नूतन शाखा इमारतीचे उद्घाटन गोरंबे (ता. कागल) येथील जंगली महाराज आश्रमाचे अंतर्गत आत्मामालिक ध्यान पीठाचे प्रमुख स्वामी संत प्रवचनकार अमृतानंद महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले . कूर बाजारपेठेत संस्थेने स्वत:च्या जागेवर ३००० स्क्वेअर फूटाच्या ९० लाख रुपये खर्चाच्या तीन मजली आरसीसी इमारतीमध्ये कूर शाखेचे या प्रसंगी स्थलांतर केले .या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी जवाहर शहा होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्था नामफलक अनावरण, ३० लाख रुपयांच्या ट्रॅक्टर व चारचाकी वाहनाचे वितरण संस्थेतर्फे करण्यात आले. सभापती किशोर पोतदार, उपसभापती दतात्रय कांबळे यांच्या हस्ते मॅनेजर केबीन व संगणक प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. तर संस्थेचे ज्येष्ठ संस्थापक संचालक जवाहर शहा, पुंडलीक डाफळे, अनंत फर्नाडीस दत्तात्रय तांबट यांच्या हस्ते अनुक्रमे संस्थेचा कोनशिला उद्घाटन कॅशिअर केबीन, लॉकर केबीन, वीजबील भरणा केद्रांचे उद्घाटनही करण्यात आले . तर सांस्कृतिक हॉलचे उद्घाटन संचालक चंद्रकांत माळवदे ( सर ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यानिमिताने इंजिनियर संजीव चावरेकर, कॉन्ट्रक्टर सुरेश रामाणे, बांधकाम कारागीर भिमराव रेडेकर, संस्था व्यवस्थापक नवनाथ डवरी, सेवक धनाजी प्रभावळे, बांधकाम सुपरवाझर अजित मसवेकर व जागा मालक मारुती कांबळे यांचा विनय पोतदार, जगदीश देशपांडे, रविंद्र खराडे संचालीका सुनिता शिंदे व सुजाता सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वामी अमृतानंद यांनी लक्ष्मीनारायण संस्थेच्या ५७ वर्षांच्या कारकिर्दीचा मुक्त कंठाने गौरव करुन संस्थेने अशाच प्रकारे समाजातील सर्व स्तरांना सहाय्यभूत आदर्श कारभार करीत राहाण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या.
कार्यक्रमांचे अध्यक्ष जवाहर शहा, संचालक डाफळे, कूरचे माजी सरपंच अनिल हळदकर, मुरगूडचे व्यापारी पत संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमांचे स्वागत – प्रास्ताविक सभापती किशोर पोतदार यांनी,सूत्रसंचालन चंद्रकांत माळवदे ( सर ) यांनी तर आभार संस्था व्यवस्थापक नवनाथ डवरी यांनी मानले.
२४ वर्षे भाडयाच्या जागेतून स्वत:च्या जागेत समारंभपूर्वक स्थलांतरीत झालेल्या संस्थेच्या या कार्यक्रमास विविध शाखांचे शाखाधिकारी सर्वश्री अनिल सणगर (कूर), सौ. मनिषा सुर्यवंशी (मुरगूड), तुकाराम दाभोळे (कापशी), के डी पाटील (सरवडे), रामदास शिऊडकर (सावर्डे बुⅡ),राजेंद्र भोसले (शेळेवाडी), संस्था सचिव मारुती सणगर यांच्यासह सेवक वृंद, कूर पंचक्रोशितील विविध गावचे आजी माजी सरपंच, संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.