बस्तवडे येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू

कागल : कागल तालुक्यातील बस्तवडे बंधारा येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, तर एकाचा शोध सुरू आहे. ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. आणुर गावाच्या यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आलेले नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाला.

Advertisements
https://app.turtlefin.com/products/credit-card/public?partnerId=630e5137e72e970ef99f3b99

जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी, कर्नाटक) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!