कोल्हापूर : सह्यगिरी शैक्षणिक विचार मंच यांच्या वतीने इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणेसाठी सह्यगिरी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली होती.
या परीक्षेत 1237 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी व धामणी खोरी या केंद्रातून जिल्हा गुणवत्ता यादीतील 50 गुणवंत विद्यार्थी निवडून त्यांना पन्नास हजार रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले . तर तालुका गुणवत्ता यादीतील ११० विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले . शिवाय उत्कृष्ट मार्गदर्शन करण्याऱ्या १५ शिक्षकांचा गौरव करणेत आला.
राम गणेश गडकरी हॉल कोल्हापूर व माणिक मल्टीपर्पज हॉल कळे या ठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, माध्यमिक विस्ताराधिकारी डी. सी. कुंभार, ए. डी. पाटील, सह्यगिरीचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे आदी मान्यवरांच्या उपपस्थितीत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना, पालकांना मार्गदर्शन करताना संपतराव गायकवाड व कृष्णात खोत यांनी सह्यगिरीच्या कामाचे कौतुक केले. केवळ पन्नास रुपये परीक्षा शुल्क घेऊन हजारो रुपये शिष्यवृत्ती वाटप करून गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही परीक्षा कोल्हापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मार्गदर्शक ठरेल. सह्यागिरी परीक्षा नियोजन मंडळाने केलेल्या या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख बाबुराव निकम व कार्याध्यक्ष तानाजी तेली यांनी केले सूत्रसंचालन विलास पाटील सर व अमोल जोगदंड सर तर आभार क्रांती सावंत यांनी मांडले.
Hi there, just became alert to your blog through Google,
and found that it’s really informative. I am going to watch out
for brussels. I’ll be grateful if you continue this in future.
Many people will be benefited from your writing.
Cheers!