मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता-क़ागल येथील अनिल अशोक देवळे यांचा पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बद्धल मुरगूडमधील श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात यथोचित सत्कार करण्यात आला . चौदा वर्षापासून ते मुंबई येथे कार्यरत आहेत.
हा सत्कार संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. किरण गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी चेअरमन व हाजी धोंडीराम मकानदार यानीं अनिल देवळे यांच्या बद्दल अनेक आठवणी उलगडत त्यांच्या कार्याबद्धल गौरव उदगार काढले.
या सत्कार कार्यक्रमास चेअरमन किरण गवाणकर , व्हा . चेअरमन प्रकाश सणगर, संचालक किशोर पोतदार , प्रशांत शहा , शशिकांत दरेकर , नामदेवराव पाटील , हाजी धोडीराम मकानदार , साताप्पा पाटील (यमगेकर ) , निवास कदम , प्रदिप वेसणेकर , संदीप कांबळे , संचालिका सौ . सुनंदा जाधव , सौ . रोहिणी तांबट , कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर , संस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते. स्वागत प्रशांत शहा तर आभार किशोर पोतदार यानीं मानले.
.