व्हॉलीबॉल च्या जोरावर यश
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अनिल अशोक देवळे यांना नुकतीच पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे.सद्या नवी मुंबई येथे ते कार्यरत आहेत.
अनिल देवळे याना शालेय वयापासून व्हॉलीबॉल खेळाची आवड होती.सन १९९४ मध्ये महाराष्ट्र संघाकडून त्यांनी तामिळनाडू येथे सहभाग नोंदवला.१९९७ ते २००० या कालावधीत शिवाजी विद्यापीठाकडून अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग घेतला.यामध्ये त्यांनी विद्यापीठ संघाचे कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली.

व्हॉलीबॉल मधील चमकदार खेळाच्या जोरावर २००१ मध्ये ते पुणे पोलीस मध्ये भरती झाले.२०१० मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली.चांगल्या कामगिरी च्या जोरावर २०१४ ला त्यांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती.चौदा वर्षांपासून ते मुंबई येथे कार्यरत आहेत.
त्यांचे वडील ही व्हॉलीबॉल खेळाडू आहेत.या संपूर्ण प्रवासात त्यांचे आणि सर्व कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याचे देवळे यांनी सांगितले.
Thank you for sharing your personal experiences and stories It takes courage to open up and you do it with such grace and authenticity
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!