कागल : मलाबार गोल्ड व डायमंड शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सी.एस.आर.फंडातून चालू वर्षी १०वी १२वी परिक्षेत ६० टक्केहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यीनींना (मुलींना) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला.शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागलला ८ लाखाहून अधिक व वडगांव विद्यालय वडगांव ला ६ लाखाहून अधिक शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थिनींच्या बॅक खाते जमा करण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती साठी सप्टेंबर २०२३ या महिन्यात १३८ विद्यार्थिनीनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते..त्यापैकी १०० हून अधिक मुलींना प्रत्येकी ८ ते १० हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.
यासाठी त्यावेळी कार्यरत मुख्याध्यापक बी.के.मडिवाळ, शिंदे व्ही.एल.मॅडम, गिरी सर, काटे सर, घोरपडे सर यांनी सहकार्य केले.रविवार दि.२५फेब्रुवारी रोजी शिंदे ..त्यावेळी मलाबारचे डायरेक्टर आबिद साहेब,मडिवाळ सर, शिंदे मॅडम, गिरी सर, कुडतरकर मॅडम, लकडे मॅडम, मलाबार गोल्ड चे सय्यद सर, सचीन सर व सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते.