विविध कार्यक्रम उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात पार
मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे ( ता. कागल ) येथील श्री . साईबाबा मंदीराचा २१ वा वर्धापनदिनानिमित्त बुधवार दि .३ जानेवारी २०२४ रोजी साईभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
साई भंडाऱ्यानिमित्त बुधवार दि .३ जानेवारी रोजी सकाळी ५ .३० वाजता श्रींचा अभिषेक व महापूजा, सकाळी ६ वाजता महापूजा व आरती, ८ वाजता साईबाबांचा सामुदायिक जप , ९ वाजता ‘सत्यनारायण महापूजा सकाळी ११ वाजता साईबाबांची महाआरती व महानैवेद्य अर्पण या वेळी मळगे बु॥ येथिल भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व दुपारी १२ वाजता महाप्रसाद तसेच सांयकाळी ७ वाजता महाआरती तर रात्री ९ वाजता बेलजाई महीला भजनी मंडळ उंदरवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ सर्व साईभक्तानी उस्पूर्तपणे घेतला. मंदिराचे पुजारी लक्ष्मण ग. निकम यांच्या नियोजनातून व भक्तांच्या सहकार्याने उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात सर्व कार्यक्रम पार पडले.