व्हनाळी (सागर लोहार) : साके ता.कागल येथे गावच्या लोकसंख्येच्या गुणसुत्रानुसार गेली अनेक वर्षी जुन्या लोकवस्तीच्या आंदाजाने गावात दोन ठिकाणी महावितरणचा विद्युत पुरवठा सुरू आहे. पण सध्या गावतील वाढीव लोकवस्ती व सुमारे 800 घरगुती कनेक्शन व थ्रीफेज ची जवळपास 5 पिठाची गिरणी तसेच लोकसंख्येनुसार घरगुती इलेक्ट्रीकल्स वस्तुंचा वाढलेला वापर यामुळे गावात सिंगलफेज होणे,विद्युत पुरवठा कमी दाबाने होणे अशा वारंवार तक्रारी होत आहेत.
त्यामुळे गावच्या वाढीव लोकवस्ती व वीजपाराचा विचार करता विद्युक पुरवठा कमी दाबाणे होत आहे याचा विचार करून नागरिकांना वीजेची होणारी गैरसोय थांबवावी यासाठी गावात दोन ठिकाणी 100 के.व्ही. चे रोहित्र (डी.पी.) तात्काळ बसवावेत तसेच गावातील लोंबकळणा-या तारांची दुरूस्ती, सडलेले पोल बदलणे,नवीन वस्तीत वाढीव स्टे्टलाईट वसवावी अशा मागणीचे लेखी निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणचे साहाय्यक अभियंता श्रेयश कुसाळे यांना देण्यात आले.
सदर रोहित्र (डी.पी.)तात्काळ बसवावेत अशा मागणीचे लेखी निवेदन ग्रामपंचायतीने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना देखील दिले असून रोहित्र बसविण्यासाठी गावठाण सर्व्हे नं.188 मध्ये प्राथमिक शाळा,बाचणी रोड चैाक अशा दोन्ही ठिकाणी जागाही उपलब्ध केली असल्याच्या ठरावाची प्रतही निवेदनासोबत जोडली आहे. यावेळी निवेदनावर बाळासाहेब तुरंबे,सी.बी.कांबळे,सरपंच सैा.सुशिला पोवार,उपसरपंच निलेश निऊंगरे,रविंद्र जाधव,युवराज पाटील,सुजय घराळ,मोहन गिरी आदींच्या सह्या आहेत.
लवकरच रोहित्र बसविणार….
रोहित्र बसविण्याच्या मागणीच्या निवेदनाच्या आधारे गावातील कमी दाबाने होणा-या वीज लोडची पहाणी करून व उपलब्ध केलेल्या जागेचा सर्वे करून नविन रोहित्र बसविण्यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून लवकरच रोहित्र बसविणार आहे.साहाय्यक अभियंता श्रेयश कुसाळे, महावितरण कंपनी