मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील तरुणाने चार दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अनिकेत भिमराव कांबळे वय २८ रा. सरपिराजी रोड मुरगूड असे व्यक्तीचे-नाव आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही.
या घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. रविंद्र पाटील यांच्या राधानगर -निपाणी रस्त्यालगत असणाऱ्या शेतामधे विहिरीच्या काठावर असणाऱ्या झाडाच्या फांदीस दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. २२ तारखेस झालेल्या या घटनेनंतर मृतदेह सडलेल्या अवस्थेत निदर्शनास आला.
रात्री उशिरा या प्रेताची ओळख पटली. रविंद्र पाटील यांनी या घटनेची वर्दी दिली. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कुंभार करीत आहेत.