जांभूळ खोऱ्यात गवा रेडयांचा संचार बंदोबस्ताची मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथून जवळच असलेल्या जांभुळ खोऱ्यात गवा रेडयांचा संचार वाढला असून या परिसरातील शेती पीकांचे मोठे नुकसान होत आहे . वन विभागाने या गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Advertisements

गवा रेडयांचा कळप जांभूळ खोरा,अवचितवाडी परिसरात आढळून येत आहे. येथील शेतकरी समीर गोरुले यांना मंगळवारी दुपारी गवा रेड्यांचा कळप दिसून आला. यासंबधी परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला कळविले आहे.

Advertisements

जांभूळ खोऱ्यातील सदाशिव मेंडके, संतोष मेंडके, भैरू इंदलकर, तानाजी मसवेकर आदि शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस व ज्वारी पीकांची मोठया प्रमाणात नासधूस गवा रेडयांकडून झाली आहे. या नुकसानीचे शासनाने पंचनामे करुन आर्थिक नुकसान भरपाई दयावी अशी मागणी होत आहे.

Advertisements
AD1

2 thoughts on “जांभूळ खोऱ्यात गवा रेडयांचा संचार बंदोबस्ताची मागणी”

Leave a Comment

error: Content is protected !!