निकम विद्यालयाची निरनिराळ्या ठिकाणी व्यावसायिक क्षेत्रभेट
पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील): वर्तमान काळात व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असल्याचा दिसत असल्याने दर दिवशी नवनवीन पद्धतींचे व्यवसाय उदयास येत आहेत ज्यामुळे न केवळ बेरोजगारी कमी होत आहे तर सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील सहाय्य मिळत आहे.
विद्यार्थ्याला एक उत्तम उद्योजक बनण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रभेट ही फायदेशीर ठरते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्हन्नूर तालुका कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयाने मूर्ती निर्मिती, पेट्रोल पंप, टिशू कल्चर, गोठा प्रकल्प, जागरी फॅक्टरी, काजू निर्मिती प्रक्रिया, क्रशर, वीट निर्मिती, फूड प्रॉडक्ट्स आणि मिल्क प्रॉडक्ट्स अशा विविध व्यावसायिक ठिकाणी क्षेत्रभेट देऊन तेथे चालणाऱ्या व्यवसायाची व त्यातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया अभ्यासली व विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव दिला.
या क्षेत्रभेटीसाठी संस्थाध्यक्षा सुनंदा निकम मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांच्या मार्गदर्शनातून बी.बी.खाडे यांनी या क्षेत्रभेटीचे नियोजन केले. क्षेत्रभेटीनंतर विद्यालयात त्याचे अहवाल वाचन झाले व त्यानंतर ए.ए.पोवार यांनी आभार मानले.