मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथिल सानिका फौडेशन यांचे काम गेली पंधरा वर्षे मी पाहत आलो आहे . त्यांचं काम खरोखरच गरजू व गरिबांना त्यांचे कायम सहकार्य असते. सानिका फाउंडेशन वतीने विविध आंदोलने होत असतात तसेच दगडू शेणवी हे कायमच देणाऱ्याच्या पंगतीत असतात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो .त्यांचे हे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय पंच व ज्येष्ठ कुस्ती विश्लेषक बटू जाधव यांनी केले.
ते मुरगूड येथे यांच्या वतीने सानिका फौडेशन निराधारांना फराळ व साहित्य वाटप प्रसंगी बोलत होते .
येथील सानिका स्पोर्टस् फौंडेशन यांच्या वतीने येथील रिक्षा चालक, नगरपरिषदेचे आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना दिपावली निमित्त फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
फराळाचे साहित्य वाटप मुरगूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे व राष्ट्रीय पंच बटू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अनंत फर्नांडिस, अमर चौगले छोटु, समाधान हावळ, गणेश तोडकर,रतन जगताप यांच्या उपस्थितीत फराळ साहित्यांच्या वाटपांचा कार्यक्रम पार पडला. मुरगूड नगरपालिका येथील यशवंतराव चव्हाण हाॅल या ठिकाणी हे वाटप करण्यात आले.
यावेळी पत्रकार स्वागत राजू चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक करताना सानिका स्पोर्टसचे संस्थापक अध्यक्ष दगडू शेणवी म्हणाले मला देवाने एक सामर्थ दिले आहे की कुणाचं हाल मला बघवत नाही.
मी परमेश्वराकडे एकच मागणी करतो की मला देणाऱ्याच्या पंगतीत बसवा घेणाऱ्याच्या नको यावेळी बोलताना ते म्हणाले की मी शालेय विद्यार्थी दसेत असताना माझे नाव कायम दारिद्रे रेषेखाली असायचे व मला दारिद्र्यरेषेखाली सवलती मिळत होत्या .त्याच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी सानिका फाउंडेशनच्या वतीने गेली पंधरा वर्षे मी विविध उपक्रम राबवतो याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
यावेळी आनंत फर्नांडिस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग -रिक्षा चालक व आरोग्य विभाग अशा 90 लोकाना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी रमेश भोई, जगदिश चितळे,निशांत जाधव, विनायक मुसळे,अरुण सावर्डेकर, अमित पाटील, उत्तम पाटील सर, विशाल कांबळे, सुरज मुसळे आदि उपस्थित होते . शेवटीआभार संतोष गुजर यांनी मानले.